आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, “एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर बेळगावचा नावलौकिक मिळविणाऱ्या कुस्ती खेळाचे पूर्वीचे महत्त्व संपुष्टात आले असून, त्याचे अस्तित्व ग्रामीण भागात टिकून आहे. कुस्ती खेळाला अधिक प्रोत्साहनाची गरज आहे.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सांबरा गावच्या कुस्ती समितीच्या वतीने आयोजित जंगी निकली कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या .
. बेळगाव जिल्ह्यातील अनेक पैलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कोरले आहे. या दिशेने अधिकाधिक आणि आणखी तालीम मंडळे सुरू करून कुस्तीचे गतवैभव परत मिळवून द्यावे, यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत, असे त्या म्हणाल्या .
विविध ठिकाणांहून आलेल्या नामवंत पैलवानांचा कुस्तीचा सामना पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती. याआधी आखाड्यात पूजा करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थ, यल्लाप्पा हरजी, गंगण्णा कल्लुर, शिवराज जाधव, नितीन चिंगळे, प्रमोद ताडे, महेंद्र गोटे, भरमा चिंगळे, नागेश देसाई, अब्दुल बागवान, संजू पाटील आदी उपस्थित होते .
Recent Comments