खानापुरातील नवीन नाईक गल्ली येथे आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते रिबन कापून व पूजन करून ‘नम्म क्लिनिक’चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी यांना लवकरात लवकर याची पूर्ण व्यवस्था करून गरीब व मागासलेल्या गरीब जनतेच्या हितासाठी डॉक्टर्स नेमावेत, असे सांगितले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे, लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Recent Comments