केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्याला वाटप करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) पडताळणीचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

येथील हिंडलगा गावातील भारतीय निवडणूक आयोगाच्या गोदामात सोमवारी (१३ फेब्रुवारी) पहिल्या टप्प्यातील मतदान यंत्रांच्या पडताळणीनंतर त्यांनी ही माहिती दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याला वापरण्यासाठी देण्यात आलेल्या मतदान यंत्रांची कसून तपासणी केल्यानंतरच वापर होण्याची खात्री केली जाईल.
जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील एकूण 18 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाकडून एकूण 8748 बॅलेट युनिट, 7216 कंट्रोल युनिट आणि 6319 व्हीव्हीपीएटी मशीन देण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पहिल्या टप्प्यातील मतदान यंत्रांची पडताळणी राष्ट्रीय व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात येत आहे.
पडताळणीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) च्या 30 कुशल अभियंत्यांकरवी प्रत्येक मतदान यंत्र नियमानुसार एकत्र केले जाईल आणि त्यांची कार्यक्षमता सुनिश्चित केली जाईल.
पहिल्या टप्प्यातील पडताळणी दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत केली जाईल. राष्ट्रीय आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या पडताळणीचे काम पाहण्यास उपस्थित राहू शकतील, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.


Recent Comments