बेळगाव रेल्वे स्थानकाला स्वातंत्र्यसैनिक सिंदुरलक्ष्मण यांचे नाव देण्यात यावे, कोणत्याही परिस्थितीत परराज्यातील व्यक्तीचे नाव देऊ नये, अशी मागणी करवेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली आहे.
व्हॉइस ओव्हर : बेळगाव शहरातील रेल्वे स्थानकाच्या आवारात , या संदर्भात बोलताना ,करवेचे विविध कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी केली . आपल्याच राज्यातील कन्नड स्वातंत्र्य सैनिकांचे बेळगावच्या रेल्वे स्थानकाला द्यावे तसेच तसेच परराज्यातील राजमहारांजाचा किंवा अन्य कोणाहचाही पुतळा रेल्वे स्थानकासमोर उभारू नये अशी मागणी वाजिद हिरेकोडी यांनी केली .
आपल्या राज्यातील अनेक कन्नड महापुरुषांचे योगदान मोठे आहे, सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अन्यथा येत्या काही दिवसात आम्हाला रेल्वे रोखून तीव्र संघर्ष करावा लागेल, असे मत करवेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कस्तुरी भावी यांनी व्यक्त केले.
त्याचवेळी प्रभू काकतीकर , प्रवीण छलवादी, शंभू गडाद ,अकबर सडेकर आदी करावे कार्यकर्ते नेते यात सहभागी झाले होते.


Recent Comments