Belagavi

दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा

Share

सध्याचा काळ खूप महत्त्वाचा आहे आणि आगामी शैक्षणिक परीक्षांमध्ये चांगले गुण आणि यश मिळवण्यासाठी आणि दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांची मानसिक आणि बौद्धिक क्षमता कशी वाढवायची यासाठी बंगळूरच्या सिग्मा फाउंडेशचे सी आई ओ अम्मीन ए. मुदस्सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

 

व्हॉइस ओव्हर : शहरातील अंजुमन ए इस्लाम कॉलेजच्या सभागृहात अल इकरा एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित कार्यशाळेत ते म्हणाले की, आजच्या मुलांनी आवडीचा विषय निवडून त्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करावा . आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नये, परिश्रमाने परीक्षेत यश मिळवावे आणि पुढील ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा.

कार्यशाळेत एकूण बाराशे मुलांनी सहभाग घेतला. मुलांच्या भविष्यातील शिक्षणासाठी हा एक चांगला मार्ग आहे. अल इकरा संस्था सलग 17 वर्षांपासून असे शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. अल इकरा ही एनजीओ संस्था देखील आहे, संस्था अनेक परोपकारी आणि सामाजिक कार्य करत आहे. अल इकरा एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शाहनवाज अहमद खान म्हणाले की, आमच्या संस्थेने , कोरोनाच्या संकट काळात चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात सामाजिक कल्याणाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या प्रसंगी अल इकरा एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे सचिव रशीद मणियार आणि
सदस्य अब्दुल कादिर कालकुदरी आदी उपस्थित होते.

Tags: