Belagavi

ऍपटेकच्या 5 विद्यार्थ्यांची विमान कंपन्यात निवड; एक विद्यार्थिनी बनली हवाई सुंदरी

Share

बेळगावातील ऍपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकॅडेमीतर्फे प्रशिक्षण प्राप्त केलेल्या 5 विद्यार्थ्यांची हैदराबाद येथील एन्कम एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी कंपनीत केबिन क्रू पदावर नोकरीसाठी निवड झाली आहे. त्यानिमित्त ऍपटेकतर्फे त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

बेळगावातील ऍपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकॅडेमीतर्फे हवाई वाहतूक क्षेत्रातील एअर होस्टेस, केबिन क्रू व अन्य पदांसाठी आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येते. संस्थेच्या 5 विद्यार्थ्यांची हैदराबाद येथील एन्कम एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी कंपनीत केबिन क्रू पदावर नोकरीसाठी निवड झाली आहे. त्यानिमित्त ऍपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकॅडेमीतर्फे त्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

गोंधळी गल्ली, बेळगाव येथील ऍपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकॅडेमीच्या सभागृहात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे प्रमुख बिझनेस पार्टनर विनोद बामणे, सरस्वती इन्फोटेकच्या मॅनेजिंग डायरेक्टर ज्योती बामणे, प्रमुख पाहुण्या युके 27 हॉटेलच्या एचआर मॅनेजर प्रीती आदींच्या हस्ते यशस्वी विध्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. ऍपटेक अकॅडेमीच्या प्रशिक्षणामुळे नोकरीचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद यावेळी विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वहात होता. फ्लो
यावेळी बोलताना मूळची इलकल येथील विद्यार्थिनी अनिता हलर हिने सांगितले की, कन्नड माध्यमातून शिक्षण घेऊनही ऍपटेक अकॅडेमीत दिलेल्या प्रशिक्षण, आधारामुळे अस्खलित इंग्लिश बोलू शकते. त्याचा मुलाखतीवेळी फायदा झाला. विनोद बामणे सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मुलाखतीला न भीत सामोरे जाण्याचा आत्मविश्वास आला. त्याचा फायदा होऊन केबिन क्रू पदी निवड झाली आहे.

विस्तारा एअर लाईन्ससाठी निवड झालेल्या समीक्षा शहापूरकर या विद्यार्थिनीने सांगितले की, ऍपटेक अकॅडेमीने दिलेल्या प्रशिक्षणामुळे मला हे यश मिळाले. येथील मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास प्राप्त झाला. या संस्थेची विद्यार्थिनी असल्याचा मला अभिमान आहे. येथे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. ज्या कोणाला हवाई प्रवासी वाहतूक क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांनी येथे जरूर प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन तिने केले. बाईट
बेळगाव जिल्ह्यातील तळावडे येथील महेश हुशनकर या विद्यार्थ्यांची हैदराबादच्या एनकम कंपनीत केबिन क्रू म्हणून निवड झाली आहे. त्यासाठीच्या मुलाखतीत ऍपटेक अकॅडेमीच्या प्रशिक्षणाचा चांगला उपयोग झाला. 4 सत्रात झालेल्या मुलाखतीत या प्रशिक्षणाच्या बळावर आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे गेलो आणि आपले नोकरीचे स्वप्न पूर्ण झाल्याचे महेशने सांगितले.

कैनात मुजावर हिने सांगितले की, ऍपटेक अकॅडेमीचे विनोद बामणे सर यांनी उत्तम प्रशिक्षण तर दिलेच पण चुकांबद्दल पनिशमेंटही दिली. त्याचा नोकरीसाठी फायदाच झाला. येथे आल्यानंतर व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास वाढीला लागला. 4 सत्रात झालेल्या मुलाखतीत अनेक प्रश्न विचारण्यात आले. येथील प्रशिक्षणाच्या बळावर त्यांना समर्थपणे उत्तरे दिली आणि यश मिळवले असे तिने सांगितले.

नार्वेकर गल्ली, शहापूर येथे राहणाऱ्या साहिल बोंगाळे याचीही केबिन क्रू म्हणून निवड झाली असून, उद्या त्याचे जॉइनिंग आहे. त्यामुळे आनंदित झालेल्या साहिलने सांगितले की, मी इंग्लिश माध्यमाचा असून देखील सफाईदारपणे इंग्लिश बोलू शकत नव्हतो. ते ऍपटेक अकॅडेमीमुळे शक्य झाले. येथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्कील, कॉन्फिडन्स बिल्डींग अशा सर्व पैलूंवर ध्यान देऊन प्रशिक्षित करण्यात आल्याने आम्हाला हे यश मिळाले आहे. त्याबद्दल आम्ही ऍपटेक अकॅडेमीचे आभारी आहोत असे त्याने सांगितले.

दरम्यान, प्रमुख पाहुण्या युके 27 हॉटेलच्या एचआर मॅनेजर प्रीती यांनीदेखील ऍपटेक अकॅडेमीकडून दिल्या जाणाऱ्या प्रोफेशनल ट्रेनिंगचे कौतुक केले. नोकरी मिळाल्याने विध्यार्थी आणि पालकांच्या डोळ्यात आज आनंदाश्रू आले आहेत. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ऍपटेक अकॅडेमीकडून मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आधारे विध्यार्थ्यानी आपल्या करिअरमध्ये यश मिळवावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

यावेळी प्रीती पडवलकर, ब्रँच मॅनेजर प्रकाश पाटील तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

Tags: