बेळगावातील शहापूर कोरे गल्लीतील सरस्वती वाचनालयातर्फे आयोजित पं. कुमार गंधर्व स्मृती संगीत संमेलनात हुबळी येथील वैष्णवी हानगल व अन्य गायकांनी संगीतसेवा सादर केली.
बेळगावातील शहापूर कोरे गल्लीतील सरस्वती वाचनालयातर्फे दोन दिवसीय पं. कुमार गंधर्व स्मृती संगीत संमेलनाचे आयोजन केले आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी आज विख्यात गायिका पद्मविभूषण कै. गंगुबाई हानगल यांची नात हुबळी येथील वैष्णवी हानगल व अन्य गायकांनी संगीतसेवा सादर केली. परंपरेने आलेली किराणा घराणा गायकी आत्मसात केलेल्या वैष्णवी हानगल यांनी यावेळी अनेक रचना सुरेल आवाजात गाऊन उपस्थित संगीत शौकिनांची वाहवा मिळवली.
सरस्वती वाचनालयाच्या डॉ. शकुंतला गिजरे सभागृहात झालेल्या या संगीत संमेलनात रवींद्र जकाती, मुंबईचे पं. राजाराम अंबोडकर आदींनी गायन सादर केले. कार्यक्रमाला बेळगाव शहर व परिसर तसेच परगावच्या संगीत शौकिनांनी हजेरी लावली.


Recent Comments