Belagavi

कडोली येथे भव्य बैलजोडी जंगी शर्यत

Share

कडोली येथील स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेच्यावतीने भव्य कर्नाटक व महाराष्ट्र राज्य हिंदकेसरी , दोनदिवसीय बैलजोडी जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे . काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी या शर्यतीचा शुभारंभ केला .

आजपर्यंतच्या इतिहासात संपुर्ण कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये देखील न झालेली डिजिटल स्क्रिनवर प्रक्षेपण होणारी कर्नाटक व महाराष्ट्र राज्य हिंदकेसरी बैलजोडी जंगी शर्यत कडोली येथे आयोजित करण्यात आली आहे . कांग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल जारकिहोळी यांनी शिवप्रतिमा पुजन करुन फित कापून,दिपप्रज्वलन व गाडा हाकून शर्यतीला चालना दिली .


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रा.पं.अध्यक्ष अण्णु कटांबले होते. यावेळी विविध देवदेवतांच्या फोटोचे पूजन करण्यात आले . अनंत पाटील सागर पाटील , प्रकाश राजाई व वसंत पावले ग्रा.पं.अध्यक्षा रेखा सुतार व सर्व महिला सदस्या उपस्थित होत्या . मलगौडा पाटील व सर्व ग्रा.पं.सदस्यांनी दिपप्रज्वलन केले.

व्यासपीठावर माजी जि.पं.उपाध्यक्ष अरुण कटांबले,चिक्कोडी एस टी ब्लॅाक अध्यक्ष रामाण्णा घुळी,बेळगाव ग्रामीण कांग्रेस ज.सेक्रेटरी प्रदीप एम.जि., जि.पं.सदस्य सिद्धु सुनगार,काकती कांग्रेस ब्लॅाक अध्यक्ष सागर पिंगट,सामाजिक कार्यकर्ता विजय पावशे,ग्रा.पं.अध्यक्षा रेखा सुतार उपाध्यक्षा रेखा नरोटी,माजी ग्रा.पं.अध्यक्षा श्रीदेवि पाटीलसह मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस 51000,दुसरे बक्षीस 45000,तर तिसरे बक्षीस 41000 हजार रुपये यासह इतर अठरा बक्षिसे असुन प्रवेश फि 5000 असुन सुमारे 70 जोड्या भाग घेण्याची शक्यता असुन दोन दिवस हि स्पर्धा चालणार असुन स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे पदाधिकारी,कुस्तीगिर संघटनासह विविध युवक मंडळे व ग्रामस्थ स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अत्यंत उत्तमरित्या नियोजनकरुन परिश्रम घेत आहेत.

Tags: