Belagavi

विकासाबद्दल कृतज्ञता : ग्रामस्थांनी आ. हेब्बाळकरांचा केला घरी येऊन सत्कार

Share

लोकप्रतिनिधी जेव्हा विकासकामे करतात तेव्हा केवळ ‘धन्यवाद’ म्हणणे आणि ते त्यांचे कर्तव्य समजणे हे सामान्य आहे. मात्र बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या घरी येऊन त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करून मतदारसंघातील जनतेने त्यांचे आभार मानले आहेत.

होय, बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सांबरा गावातील श्री कलमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 30 लाख रुपये मंजूर केल्याबद्दल सांबरा येथील ग्रामस्थांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गृह कार्यालयात पोहोचून त्यांचे आभार मानले व आशीर्वाद दिले.

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गावाच्या विकासासाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त करत मतदार संघाच्या विकासासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या लक्ष्मी हेब्बाळकार यांना सदैव साथ देणार असल्याचे सांगितले.

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेम, प्रोत्साहन, आशीर्वाद आणि आपुलकीने केलेल्या सन्मानाबद्दल त्यांचे मनापासून आभारच मानले नाहीत तर पुढील विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांच्या या प्रेमाने, विश्वासाने त्यांना आणखी काम करण्यास प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री कलमेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष आण्णाप्पा देसाई, उपाध्यक्ष शिवाजी हिरोजी, सदस्य भैरू हिरोजी, दशरथ गुरव, उमेश मास्तमर्डी, अरविंद नायक, देवप्पा हिरोजी, नागराज पुजेरी, परशुराम भातकांडे, मारुती हिरोजी, शंकर गुरव, प्रकाश मुचंडी, काकासाहेब शासन, गजानन कम्मार आदी उपस्थित होते. यावेळी
महिलांही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या, हे विशेष.

Tags: