धारवाड तालुक्यातील गरग मडीवाळेश्वर कलमठाचे श्री चन्नबसव स्वामीजी यांचे रविवारी सकाळी निधन झाले. स्वामीजी ९० वर्षांचे होते.

स्वामीजी गेल्या काही दिवसांपासून वयोमानाच्या आजाराने त्रस्त होते. गरग मठाच्या आवारात सायंकाळी ५ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्यसंस्कारासाठी राज्यातील विविध मठाधिपती आणि प्रतिनिधी येणार आहेत. कलमठाचे प्रभारी चन्नबसव स्वामीजींनी मठाच्या विकासासाठी रात्रंदिवस काम केले. तसेच अन्नदान आणि शिक्षण दानावर भर देऊन त्यांनी मोठी समाजसेवा केली.


Recent Comments