ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने कन्नड समर्थकांविरुद्ध राऊडी शीटर गुन्हा दाखल केला आहे . बेळगाव महापालिकेत मराठी भाषिकांना महापौर आणि उपमहापौरपद दिल्याने कन्नडिगानी विरोध दर्शवला होता . आता राज्य सरकारने या कन्नड आंदोलकांविरोधात कारवाईचे सत्र सुरु केले आहे .
कन्नड समर्थकांविरोधात बेळगाव पोलिसांनी उग्र पत्रक जारी केले आहे.एमईएसचे नेते दीपक दळवी यांच्या चेहऱ्यावर शाई फेकणाऱ्यांविरोधात बेळगाव पोलिसांनी नोटीस जारी केली आहे.संपतकुमार देसाई आणि अनिल दड्डीमनी यांच्या विरोधात पोलसांनी राऊडी शीटर गुन्हा दाखल करून , अनिल दड्डीमनी याला टिळक वाडी पोलीस स्थानकातून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकातून संपत कुमार देसाई याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक काळात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने 50 हजार रुपयांचा वैयक्तिक जामीन , हमीपत्र तसेच , तेवढ्याच रकमेचे दोन जामीन देण्याची नोटीस वाजवण्यात आली आहे .
तसेच पिरणवाडीत क्रांतिवीर सांगोली रायण्णा यांचा पुतळा बसविण्याच्या संघर्षात

आघाडीवर असलेले दोन तरुण, डिसेंबर २०२१ मध्ये बेळगाव अधिवेशनाला विरोध म्हणून एमईएसने आयोजित केलेल्या महामेळाव्यात प्रवेश केलेले आणि एमईएसचे नेते दीपक दळवी यांना शिवीगाळ व चेहऱ्यावर शाई फेकणाऱ्या दोन कन्नड कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी नोटीस बजावली आहे .
एमईएसचे नेते दीपक दळवी यांच्या चेहऱ्यावर शाई मारल्यानंतर तुरुंगातून जामिनावर सुटलेले दोन कन्नड कार्यकर्ते पोलिसांच्या नजरेत आहेत.
या दोघांवर राऊडी शीटर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यामुळे राज्य सरकार आणि पोलिसांविरुद्ध कन्नड संघटना भडकल्या आहेत . संपतकुमार देसाई आणि अनिल दड्डीमणी यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची त्यांची मागणी आहे.
सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर ही मोहीम सुरू झाली आहे.


हे कन्नडविरोधी सरकार आहे , आमचे सरकार आमचे नाही.. बेळगाव आमचे नाही.. या हॅशटॅगच्या नावाने एक मोहीम सुरू झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केली जात आहे. राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त करीत कन्नडिगांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे कि हे कन्नडिग विरोधी सरकार आहे.


Recent Comments