Khanapur

आ. अंजली निंबाळकरांनी लुटला शेतीचा आनंद; काढली रताळी

Share

खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर या आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून लोकांत मिसळतात, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होता. अशाचप्रकारे त्यांनी शेतकऱ्यांसमवेत रताळी काढणी करून शेतीचा आनंद लुटला.

खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील शेतकरी अधिकाधिक रताळ्याचे पीक घेतात. हे पीक कोरड्या जमिनीत किंवा कमी पाणी असलेल्या उंच जमिनीत घेतले जाते. या भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. आपल्या उपजीविकेसाठी क्षेत्र या पिकावर अवलंबून आहे.

या पिकाबद्दल आस्था असलेल्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी शेतकर्‍यांसोबत वेळ घालवून रताळे पिकाची माहिती घेतली. रताळे पिकाला योग्य बाजारपेठ कशी मिळवता येईल याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी रताळी लावणी, वाढ आणि काढणी याची शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. रताळ्यापासून उपपदार्थ निर्माण करून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळवण्याचा सल्ला दिला. आमदार निंबाळकर नेहमी कोणत्या ना कोणत्या मिटींगमध्ये बिझी असतात. पण त्यांनी शेतकऱ्यांसोबत शेतात काही वेळ घालवून हसत खेळत गप्पा मारल्या.

Tags: