धारवाड येथील रेल्वे स्टेशन गेटजवळील अभिमान बार आणि रेस्टॉरंटमध्ये काल रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करून बारच्या गल्ल्यातील 2.20 लाखांची रोकड लुटल्याची घटना उघडकीस आली आहे.
बारच्या खिडकीचा लोखंडी रॉड तोडून आत प्रवेश मिळवून चोरट्यांनी बारमधील अंदाजे 2.20 लाखांची रोकड चोरून नेली. बार फोडून चोरट्यांनी कोणतीही दारूची एकही बाटली पळवली नाही. मात्र पैशांसोबत त्यांनी बारमधील सीसीटीव्ही कॅमेरेही नेले आहेत. कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी ब्याकोड, एसीपी विजयकुमार यांच्यासह विद्यागिरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या संदर्भात विद्यागिरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी जाळे विणले आहे.


Recent Comments