विद्यार्थ्यांना आपल्या भारतात उत्पादित होणाऱ्या तृणधान्याची ओळख आणि पौष्टिकता समजावी यासाठी बेळगावच्या भाऊराव काकतकर महाविद्यालयात , तृणधान्यापासून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
सदर स्पर्धेत सहभागी झालेली स्पर्धक मानसी पाटील हिने , ज्वारी , बाजरी तसेच नाचणी यापासून गर्भवती स्त्रीची रांगोळी घातली होती . यासंबंधी माहिती देताना तिने सांगितले कि , तृणधान्यांमध्ये मानवी शरीराला आवश्यक अशी जीवनसत्वे, प्रथिने आणि पौष्टिकता असते . गर्भवती स्त्रियांना प्रसूतीपर्यंतच्या काळात , तसेच गर्भाच्या पोषणासाठी आवश्यक अशी सर्व पौष्टिकता तृणधान्यापासून मिळत असल्याने , अशी रांगोळी काढल्याचे तिने सांगितले .

महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी माहिती देताना सांगितले कि , २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे . आपल्या भारतात उत्पादित होणारी तृणधान्ये , अत्यंत महत्वपूर्ण आहेत . आहार आरोग्याच्या दृष्टीने हे तृणधान्ये परिपूर्ण आहेत . विद्यार्थ्यांना तृणधान्याची ओळख व्हावी या दृष्टीने , भाऊराव काकतकर कॉलेजच्या विज्ञान आणि सांस्कृतिक विभागाकडून , तृणधान्यापासून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . ३० विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला असून आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारावर , रांगोळ्या साकारल्या आहेत .
तांदूळ , ज्वारी , बाजरी , नाचणी आदी तृणधान्यापासून , विद्यार्थ्यांनी आकर्षक आणि संदेशयुक्त रांगोळ्या साकारल्या होत्या .
एकंदर भाऊराव काकतकर महाविद्यालयात तृणधान्यांच्या वापरातून संदेश देणाऱ्या रांगोळ्यांचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला .


Recent Comments