मुलीची छेड काढल्याप्रकरणी दोघांचे मुंडण करून धिंड काढल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजू चव्हाण व राजू चव्हाण चे मुंडण करून बसवनगर, हेगडीहाळ तांडा येथे त्यांची धिंड काढण्यात आली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ग्रामपंचायत अध्यक्षासह 7 जणांना ताब्यात घेतले आहे. अनिल लमाणी, मंगेश, हेमू, रमेश, राजू, चन्नू, रामसिंग लमाणी ह्यांना अटक करण्यात आली आहे .
या प्रकरणी विजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments