चिकोडी तालुक्यातील अंकली येथील , के एल इ संस्थेच्या श्रीमती शारदा कोरे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व सन 2022-23 च्या क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचा सांगता समारंभ पार पडला .
अनुभव मंटप, शिवालय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश एस. पाटील होते . अंकलीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमात कसे सहभागी करून घ्यावे याचे मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुण्या म्हणून , गोकाकच्या , शासकीय पदवीपूर्व कॉलेजच्या इंग्रजी विषयाचा प्राध्यापिका अन्नपूर्णा कुरबेट उपस्थित होत्या . समर्पण व परिश्रमाने आपले ध्येय साध्य करता येते याचे उदाहरण देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले . यावेळी शाळेचे शिक्षक , कर्मचारी तसेच के एल इ संस्थेचे सदस्य उपस्थित होते .


Recent Comments