बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कंग्राळी खुर्द गावातील ज्योती नगर आणि रामनगरमध्ये रस्ते आणि नाल्यांच्या बांधकामासाठी महात्मा गांधी नगर विकास योजनेतून 3.50 कोटी रुपये निधी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंजूर करवून घेतला आहे. त्यांच्याहस्ते शुक्रवारी भूमिपूजन करून रस्ता व गटार बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना, गेल्या ५ वर्षांपासून मी अथकपणे या क्षेत्राचा विकास करत आहे. मी शासकीय अनुदान, लक्ष्मीताई फाऊंडेशन अनुदान आणि माझ्या स्वत:च्या निधीतून अनेक कामे केली आहेत. मतदारांचे प्रेम, विश्वास आणि प्रोत्साहन यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकास करणे शक्य झाले आहे. काही लोक केवळ राजकीय कारणांसाठी टीका करतात त्याला माझी हरकत नाही. देव आणि लोक सर्व काही पाहत आहेत. मला विश्वास आहे की ते मला कधीही सोडणार नाहीत असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच ज्योती पाटील, युवराज कदम, लता पाटील, केम्पण्णा सनदी, मोहन कांबळे, आनंद भजंत्री, मीनाक्षी मुतगेकर, पूनम बेन्नाळकर, राहुल पाटील, विशाल भोसले, मोहन पाटील, नीलेश किल्लेकर, पिंटू राजगोळकर आदी उपस्थित होते.


Recent Comments