Vijayapura

मुलीची छेड काढल्याने दोघांचे मुंडन करून काढली धिंड

Share

मुलीची छेड काढल्याबद्दल दोघांचे मुंडण करून चप्पलांचा हार घालून गावात धिंड काढल्याची घटना विजापूर तालुक्यातील हेगडीहाळ लमाणी तांडा येथील बसवनगरात घडली.

तेजू चव्हाण आणि राजू चव्हाण यांचे मुंडन करण्यात आले आहे. आमदार देवानंद चव्हाण यांच्या मतदारसंघात हेगडीहाळा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष रामसिंग व तांडा प्रमुख यांच्या उपस्थितीत हे मुंडण करण्यात आले आहे .या दोघांनी मुलीची छेड काढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती .

अद्याप घटनेचा तपशील समजू शकलेला नाही. ज्येष्ठांच्या उपस्थितीत दोघांचे मुंडन करण्यात आले. यावेळी , पोलीस घटनास्थळी दाखल झाले . . ही घटना विजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात घडली.

Tags: