धारवाड ग्रामीणचे माजी आमदार शिवानंद अंबडगट्टी यांचे गुरुवारी पहाटे एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.

1989 पासून राजकारणात सक्रिय असलेले शिवानंद अंबडगट्टी हे वीरशैव लिंगायत राष्ट्रीय महासभेचे उपाध्यक्षही होते. एस. एम. कृष्णा सरकारच्या काळात त्यांनी धारवाडचे आमदार म्हणून अनेक लोक कल्याणकारी कामे केली होती. अंबडगट्टी यांच्यावर धारवाड जिल्ह्यातील अळणावर शहरातील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंबडगट्टी यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बेळगावचे सीईआर सेलचे एसपी म्हणून नुकतेच निवृत्त झालेले पोलीस अधिकारी राजेंद्र अंबडगट्टी यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.


Recent Comments