बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील श्री सिद्धेश्वर मंदिराची वास्तुशांती तसेच कळसारोहण समारंभासाठी समस्त सिद्धेश्वर भक्तमंडळी तसेच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारे देणगीदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी केले आहे .
श्री सिद्धेश्वर मंदिराची वास्तुशांती तसेच कळसारोहण समारंभाविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी सांगितले कि , बेळगाव जिल्हयातील कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिर हे प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे . या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून , मंदिराची वास्तुशांती तसेच कळसारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . १२ फेब्रुवारी रोजी , गावातील श्री महालक्ष्मी मंदिरापासून , श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत कळसाची मिरवणूक काढण्यात येणार आहे . १३ फेब्रुवारीला गणहोम तसेच १४ फेब्रुवारीला कळसारोहण आणि वास्तुशांती केली जाणार आहे . या कार्यक्रमासाठी , बेळगाव जिल्हा तसेच शहरातील श्री सिद्धेश्वर भक्तानी ,तसेच मंदिरासाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे देणगीदार , महापालिकेचे अधिकारी तसेच
विकासासाठी पुढाकार घेणारे बेळगाव उत्तरचे आमदार श्री अनिल बेनके याना देखील आम्ही आमंत्रित करीत आहोत . सर्वानी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून श्री सिद्धेश्वरांचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी केले आहे .
पत्रकार परिषदेला , राघवेंद्र पाटील तसेच मंदिर ट्रस्ट कमिटीचे सदस्य उपस्थित होते .


Recent Comments