सुटीवर गावी आलेल्या सैनिकाचा , ट्रॅक्टरवरून खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याची घटना , धारवाडमधील गरग लोकूर क्रॉसजवळ घडली .
धारवाड जिल्ह्यातील हरोबेलवाडी येथील रहिवासी असलेला नागप्पा उदुमेशी (वय २७) या सैनिकाचा ट्रॅक्टरवरून पडून मृत्यू झाला. गरग येथील श्री मडीवाळेश्वर जत्रेला जाऊन , मित्रांसोबत परतत असताना गरग-लोकुरू क्रॉसजवळ ट्रॅक्टरवरून पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला .
त्याने यापूर्वी देशातील अनेक राज्यांमध्ये सैन्यात सेवा बजावली होती. त्याची अजून 8 वर्षे सेवा बाकी होती . माजी मंत्र्यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या शिवलीला कुलकर्णी यांनी मृत सैनिकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले .


Recent Comments