Belagavi

जगजीवनराम उद्यानात स्वच्छतागृहाची मागणी

Share

बेळगावातील संगमेश्वर नगरमधील बाबू जगजीवनराम उद्यानात स्वच्छतागृहाची उभारणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

संगमेश्वर नगरमधील बाबू जगजीवनराम उद्यान हे परिसरातील नागरिकांना अत्यंत सोयीचे उद्यान आहे. रोज सकाळ-संध्याकाळी नागरिक या उद्यानात फिरायला येतात. या उद्यानात लोकांसाठी स्वच्छतागृहाची सोय नाही, दिवे कमी आहेत. बागेत साप आहेत, बाजूला कंपाऊंड नाही. गार्ड रूम आहे, पण ती खोली जीर्ण अवस्थेत आहे, गार्डनमध्ये स्वच्छतागृहाची सुविधा नसताना पहारेकरी राहतात. याबद्दल महिलांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

एकंदर, स्मार्टसिटी कंपनी आणि बेळगाव महापालिकेने या मागणीची दखल घेऊन येथे स्वच्छतागृह बांधून नागरिकांची सोय करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Tags: