बेळगाव ते पंढरपूर रेल्वे पूर्ववत करण्याची मागणी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केली आहे .
बेळगाव ते पंढरपूर रेल्वे पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीसाठी वारकरी संप्रदाय तसेच श्रीराम सेना हिंदुस्थान कडून भजन करून आंदोलन छेडण्यात आले . यावेळी ते बोलत होते . ते म्हणाले कि, बेळगाव जिल्ह्यातील समस्त वारकरी बंधू वर्षातून दोन वेळा मोठ्या संख्येने पंढरपूरला जातात . त्याचप्रमाणे , एकादशीला दरमहा दोनदाही जाणारे वारकरी आहेत . कोरोनामुळे ह्या रेल्वेच्या फेऱ्या कमी करून आठवड्यातून एकदा , शुक्रवारी सकाळी ही रेल्वे सोडण्यात येत आहे . त्यामुळे पंढरपूरला जाण्यासाठी , वारकऱ्यांची गैरसोय होत आहे . त्यामुळे बेळगाव ते पंढरपूर रेल्वे पूर्ववत करण्याच्या मागणीचे निवेदन रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहे .
त्याचप्रमाणे बेळगाव रेल्वे स्थानकावर , उदघाटनाआधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा अशी मागणी त्यांनी केली .
यावेळी वारकरी तसेच श्रीराम सेना हिंदुस्तानचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते .


Recent Comments