दिलेल्या आश्वासनानुसार , कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे आवश्यक सुविधा , आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यात आल्याची माहिती आ . अनिल बेनके यांनी दिली .
बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आ . अनिल बेनके यांनी , कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या कामकाजाची पाहणी करून माध्यमांना माहिती दिली .
ते म्हणाले कि ,बेळगावमधील श्री सिद्धेश्वर देवस्थान पुरातन व जागृत देवस्थान आहे . १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी मंदिराची वास्तुशांती आणि कळसारोहण होणार आहे . त्याआधी इथे आवश्यक असलेल्या सोयीसुविधांबद्दल , २ महिन्यांपूर्वी इथल्या पंचमंडळींशी चर्चा केली होती . त्यानुसार , कणबर्गी गाव ते श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली आहे . देवस्थानच्या प्रवेशद्वारावर , काँक्रीट घालण्यात आले असून पथदीप बसवण्यात आले आहे .
यावेळी आमदारांसमवेत , श्री सिद्धेश्वर व्यवस्थापक मंडळ , श्री सिद्धेश्वर भक्त मंडळ ,, संजय सुंठकर , सिद्राय सांबारेकर , भावकांना हिरोजी , अप्पय्या बिर्जे , मारुती पुजारी , सुबराव करडी , टोपाण्णा अंतरगळी , व रहिवासी उपस्थित होते .


Recent Comments