Chikkodi

आधी देश मग धर्म असे मानून चालले पाहिजे : चैत्रा कुंदापुर

Share

श्री रामचंद्रांच्या आदर्शानुसार आधी देश मग धर्म येतो. त्यामुळे आपण आधी देशासाठी कर्तव्य केले पाहिजे असे वक्त्या चैत्रा कुंदापुर यांनी सांगितले.

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर शहरातील युवक संघटनेने स्वामी विवेकानंद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. भगवद्गीता आणि संविधान एकत्र घेत पुढे गेले पाहिजे. देशावर, आपल्या संस्कृतीवर प्रेम केले पाहिजे, असे सांगितले.

त्यानंतर हुक्केरी क्यारगुड्ड मठाचे श्री अभिनव मंजुनाथ स्वामीजी म्हणाले की, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. देश हा जात, धर्म, पंथ, भाषेपेक्षा मोठा आहे. जेंव्हा जेंव्हा देशावर परकीय आक्रमणे झाली तेंव्हा तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज, राणी कित्तूर चन्नम्मा यासारख्या महापुरुषांनी त्यांच्याविरुद्ध लढा दिला आणि आक्रमण रोखले. भारत देशाची अखंडता तेव्हाच टिकेल जेव्हा हिंदू समाज जात, भाषा, प्रांत हे भेद विसरून आपण सर्व एकाच आईची लेकरे आहोत असा विचार करेल असे ते म्हणाले.

गौरीशंकर मठाचे श्री रेवणसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या सानिध्यात कार्यक्रम झाला. सुनील काडेशगोळ, बसवराज तोरणहळ्ळी, महादेव बन्नी, विठ्ठल पड्डी, आनंद मगदूम, सिद्धू संगाटे, बसू खोत, नागेश बेलगली, अजित कमते, नागेश बन्नी, पवन कुलकर्णी, बसू अम्मीनभावी यांच्यासह सर्व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: