Chikkodi

पुण्यजल, वाल्मिकी मूर्ती कर्नाटकातून अयोध्येला रवाना

Share

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील तोरणहळ्ळी गावात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे जिल्हा कार्यकर्ता आणि हनुमान मालाधारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे राष्ट्रीय सहमंत्री आणि अयोध्या राम मंदिर बांधकाम प्रभारी गोपालजी सहभागी झाले होते. चिक्कोडी भागातील विविध गावात भगवान हनुमानाला अभिषेक केलेले पवित्र जल तोरणहळ्ळीमध्ये जमा करण्यात आले. हे पवित्र पाणी अयोध्येतील श्री रामाच्या अभिषेकासाठी पाठवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रामायणाचे लेखक महाकवी वाल्मिकी यांची मूर्ती गोपालजींना देण्यात आली. ती मूर्ती अयोध्येतील राममंदिरात बसवण्याचा निर्णयही घेतला आहे. हा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री गोपालजी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. फ्लो
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री गोपालजी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, अयोध्येत राम मंदिर उभारणी पूर्ण वेगाने सुरू आहे. कर्नाटकातील पुण्यजल, वाल्मिकी मूर्ती अयोध्येला अर्पण केली जात आहे हे वाखाणण्याजोगे आहे.

यावेळी चिक्कोडी चरमूर्ती मठाचे शून्य संपादन स्वामीजी, गदग मठाचे श्रीमन्निरंजन जगद्गुरू सदाशिवानंद स्वामीजी, आवजिकर मठाचे मंजुनाथ स्वामीजी, क्यारगुड्ड हुक्केरी कौलागुड्डा मठाचे अमरेश्वर स्वामीजी यांची भाषणे झाली. मंत्री शशिकला जोल्ले, आमदार दुर्योधन ऐहोळे, महेश कुमठळ्ळी, चिक्कोडी जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, माजी खासदार रमेश कत्ती, माजी मंत्री शशिकांत नाईक, ज्योतिप्रसाद जोल्ले विठ्ठलजी, डॉ. आर. के. बागी आदी उपस्थित होते

Tags: