विजापूरच्या बबलादी मठाची भविष्यवाणी पुन्हा एकदा खरी ठरली आहे. तुर्की, सीरियात झालेल्या भयंकर भूकंपाचा मठाने यापूर्वीच अंदाज वर्तवला होता.
गेल्या वर्षी 2022 च्या शिवरात्रीदिवशी केलेली भविष्यवाणी वर्षभरातच खरी ठरली आहे. “जमीन भूकंपाने हादरेल, उत्तरेला हादरेल असे भाकीत बबलादी मठाच्या कालगणनेत म्हटले होते. कालगणना भविष्यवाणीत म्हटल्याप्रमाणे सृष्टीला दु:ख, तोटा होईल. हे जगासाठी फार कठीण आहे.. पापी पाकिस्तानात अन्नासाठी हाहाकार माजेल असे म्हटले होते. ते खरे ठरले आहे, पाकिस्तानात आता खायला पुरेसा गहू मिळत नसल्याने जनतेला संघर्ष करावा लागत आहे.
अशा प्रकारे बबलादी मठाकडून वर्तवण्यात आलेली कालगणना पुन्हा खरी ठरली आहे. आता 20 फेब्रुवारी रोजी पुन्हा कालज्ञान सांगण्यात येणार असल्याने भाविकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.


Recent Comments