Belagavi

“साऊथ इंडियन हिरो” मध्ये उत्तर कर्नाटकी भाषेचा वापर

Share

कन्नड चित्रपटात यापूर्वी उत्तर कर्नाटकी भाषा फक्त गाण्यांसाठी वापरली जायची. पण “साऊथ इंडियन हिरो” या चित्रपटात या भागाची 60% भाषा वापरली आहे असे दिग्दर्शक नरेश कुमार यांनी सांगितले

बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना दिग्दर्शक नरेश कुमार म्हणाले, उत्तर कर्नाटकाही संस्कृती, परंपरा आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून या ठिकाणची राज्यभर पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

चित्रपटाचा नायक सार्थकने सांगितले की, “साऊथ इंडियन हिरो” हा चित्रपट संपूर्णपणे उत्तर कर्नाटकच्या भाषेत बनला आहे. हा माझा पहिला चित्रपट आहे आणि तो 24 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. यात उत्तर कर्नाटकाची भाषा बहुतेक वापरली आहे. आम्ही हंपी परिसरात याचे शूटिंग केले आहे. ‘घमा घमा’ आणि ‘होळीगे’ या गाण्यांना अप्रतिम प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

चित्रपटाची मुख्य अभिनेत्री काशिमा हिने सांगितले की, हा एक खास चित्रपट आहे. मी फक्त उत्तर कर्नाटकची भाषा बोलले आहे. मला ही भाषा खूप आवडली. कृपया सर्वांनी चित्रपट पहावा असे आवाहन तिने केले.

Tags: