Belagavi

प्रल्हाद जोशी यांना मुख्यमंत्री करणे न करणे हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न : सतीश जारकीहोळी

Share

भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवल्यास ब्राह्मण आमदाराला किंवा प्रल्हाद जोशी यांना मुख्यमंत्री करणे किंवा न करणे हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी दिली.

बेळगाव तालुक्यातील तारिहाळ येथे झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना जेडीएस नेते कुमारस्वामी यांच्या, रा. स्व. संघ आणि भाजप ब्राह्मण नेते प्रल्हाद जोशी याना मुख्यमंत्री करण्याचा डाव रचत आहे, या विधानावर प्रतिक्रिया देताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, प्रत्येक पक्षात कोणत्या जातीच्या, समुदायाच्या नेत्याला मुख्यमंत्री करायचे, हे सुरूच असते. बहुमत मिळाल्यावर कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो, हे ज्या-त्या पक्षावर अवलंबून आहे. मात्र भाजप जात-धर्माच्या आधारावर निवडणुका लढविण्याचा प्रयत्न करत आहे असे त्यांनी सांगितले.

केपीसीसी अध्यक्ष काँग्रेसच्या चिन्हात बदल करण्याबाबत बोलले त्यात काय विशेष, चिन्हावर ६ रेघा असल्या अन ७ असल्या काय, त्याने काय फरक पडतो? केवळ काँग्रेस पक्ष, एकूण काँग्रेसची सत्ता आली पाहिजे. लोकांचा विश्वास आमच्या पाठीशी आहे, आमचा विश्वास आमच्या पाठीशी आहे असे ते म्हणाले.

बेळगाव ग्रामीणमध्ये रमेश जारकीहोळी यांनी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांना लक्ष्य केले आहे, तर सतीश जारकीहोळी यांनी त्यांना निवडणून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे का या प्रश्नावर, कोण कोणाला लक्ष्य करू शकत नाही. बेळगाव ग्रामीण असो वा, यमकनमर्डी असो, आमचे मतदार आमच्यासोबत आहेत. आम्ही अनेक विकासकामे केली आहेत. जनतेचा विश्वास आमदारांवर आहे. ते आमच्या विजयासाठी उपयुक्त ठरेल. लोक आमचे काम पाहतात. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत लाखो टीका, आरोप होत असतात. त्याची चिंता कशाला?
लोक भक्कमपणे आपल्या बाजूने असताना कोणीही आमचे वाकडे करू शकत नाही असे त्यांनी सांगितले.

2023च्या निवडणुकीमध्ये, ‘उत्तर कर्नाटकचे सतीश जारकीहोळी सीएम होणार’ हा प्रचाराचा मुद्दा असेल का या प्रश्नावर, मी शंभर वेळा सांगितले आहे, 2028 साठी ती मोहीम असेल असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसची प्रजाध्वनी बस यात्रेची बस पंक्चर झाल्याच्या भाजपच्या आरोपावर, बस सुरळीत धावत आहे, थांबण्याची समस्या नाही. 100 मतदारसंघ मार्चच्या आत कव्हर करावे लागतील असे जारकीहोळी म्हणाले.

एकंदर, विविध मुद्द्यांवर आ. सतीश जारकीहोळी यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Tags: