जन्मापासूनच्या गरजांपेक्षा माणसाच्या शेवटच्या संस्कारांना जास्त महत्त्व असते. मरणानंतरही माणसाला आदराने वागवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले.
बडस के.एच. गावातील दलित समाजाच्या स्मशानभूमीसाठी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी वैयक्तिक ३ लाख रुपयांची आर्थिक मदत केल्यानंतर ते बोलत होते.
कोणत्याही पायाभूत सुविधांचा अभाव न राहता दलित स्मशानभूमी विकसित करण्यासाठी या अनुदानाचा वापर करावा, असा सल्ला त्यांनी दलित समाजाच्या नेत्यांना दिला.
यावेळी शंकर गिड्डबसन्नवर, इनायत अली अत्तार, मन्सूर अली, प्रशांत पाटील, शंकर पाटील, भरमा शिगीहळ्ळी, गौस शिंपी, सदेप्पा हादिमनी, कल्लाप्पा व्हन्नूर, अर्जुन जिम्मण्णवर, भीमा शिमणीहडी यांच्यासह बडस के. एच. गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.


Recent Comments