Dharwad

धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हायड्रामा

Share

आश्रय योजनेतील घरासाठी एका रिक्षाचालकाने अर्धनग्न अवस्थेत हायड्रामा केल्याची घटना धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडली.

आसिफ बेग नामक रिक्षाचालकाने धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हायड्रामा केला. अर्ज करून देखील आश्रय योजनेतील घर मंजूर न झाल्याने घरासाठी त्याने अर्धनग्न होऊन निदर्शने केली. आसिफ बेगने शर्ट आणि बनियन काढून संताप व्यक्त केला. आसिफने न्याय कुठे आहे हे कन्नड गाणे गायले. आश्रय योजनेच्या घरासाठी अर्ज केलेल्या आसिफने सांगितले की, मला अद्याप घर मिळाले नाही, तो मद्यधुंद अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला आणि अण्णा कोडो परमात्मा… हे गाणे जोरदार आवाजात म्हणत सर्वांचे लक्ष वेधले.

Tags: