Belagavi

संत मीरा शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

Share

बेळगावातील अनगोळमधील संत मीरा इंग्लिश शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शाळेच्या माधव सभागृहात उत्साहात पार पडला.

शालेय प्रार्थनेनंतर सरस्वती, भारत माता पूजन, दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एलआयसीचे सेवानिवृत्त विभागीय व्यवस्थापक व रंगसंपदाचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुलकर्णी, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. पद्मा कुलकर्णी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व विद्याभारती कर्नाटक प्रदेशाध्यक्ष परमेश्वर हेगडे होते. शाळेचे प्रशासकीय अधिकारी राघवेंद्र कुलकर्णी व मुख्याध्यापिका सुजाता दफ्तरदार व्यासपीठावर उपस्थित होते.

ऋषिका महागंडी यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिवे प्रज्वलित करून वडीलधार्‍यांचे आणि शिक्षकांचे आशीर्वाद घेतले. वर्षातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून चिरंजीव पृथ्वीराज शिंदे, उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सानिका माळवी, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून वैभव मरगाळे, स्वरा अजानकर, सई बसरीकट्टी आणि अथर्व डेंजी यांना त्यांच्या पालकांसह मंचावर बोलावून रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शिक्षिका रुपाली जोशी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पद्मा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना कथेच्या माध्यमातून कानमंत्र दिला. परमेश्वर हेगडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जनकल्याण ट्रस्टचे सदस्य, पालक, शाळेचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

Tags: