सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच शिवसेनेच्या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे , शिवसेनेचे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर म्हणाले .
बेळगाव शहरातील सम्राट अशोक चौकात आयोजित केलेल्या शिवसैनिक हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या ” व्यर्थ न हो बलिदान ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले कि , गेली 66 ते 67 वर्षे लोकशाही मार्गाने आम्ही हा लढा देत आहोत . मात्र या लढ्याला अद्याप यश आलेले नाही . 2004 साली हा प्रश्न न्यायालयात गेला मात्र आजतागायत सीमा प्रश्नाला न्याय मिळाला नाही . 1969 मध्ये झालेल्या आंदोलनात ६७ शिवसैनिक हुतात्मे झाले . हा प्रश्न लवकरात लवकर सोडवून , सर्वांचे स्वप्न साकार करूया असे ते म्हणाले .
यावेळी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी सांगितले कि , केंद्रीय मंत्र्यांना मुंबईत येण्यास त्यावेळी मज्जाव करण्यात आला होता . परंतु तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण मुंबईत आले त्यांना शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या संरक्षणातून ते निघून गेले . त्यानंतर , 8 फेब्रुवारी 1969 मध्ये मोरारजी देसाई मुंबईत आले त्यावेळी शिवसेनेच्या वतीने निदर्शनाने करण्यात आली . त्यावेळी शिवसैनिकांना ठोकरून त्यांची कार पुढे गेली . त्यावेळी शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि मुंबई बंद करण्यात आली . यावेळी बाळासाहेब ठाकरेंना तुरुंगवास भोगायला लागला . आजचे मुख्यमंत्री आम्ही त्या आंदोलनात होतो असे म्हणतात पण , ज्या प्रश्नासाठी आंदोलन झाले तो प्रश्न अजून शिल्लक आहे .
प्रारंभी शिवसेना बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर , यांनी मशाल प्रज्वलित केली . यावेळी अमर रहे , अमर रहे , हुतात्मा अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या .\
यावेळी , माजी महापौर शिवाजी सुंठकर , प्रकाश मरगाळे ,किरण गावडे, नगरसेवक रवी साळुंखे , वैशाली भातकांडे , शिवाजी मन्नोळकर , मनोज पावशे , मुरलीधर पाटील , राजकुमार बोकडे , शुभम शेळके , विकास कलघटगी , वर्षा आजरेकर , प्रवीण तेजम , विनायक बेळगावकर , दिलीप बैलुरकर ,
माजी महापौर सरिता पाटील, महेश टंकसाळी , रामचंद्र मोदगेकर आदी उपस्थित होते .


Recent Comments