अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी बेळगावमधील दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराला भेट देऊन , श्री कपिलनाथांचे दर्शन घेतले .
कपिलेश्वर मंदिराला जवळपास १४ वर्षांनंतर , गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी भेट दिली . यावेळी त्यांचे कपिलेश्वर ट्रस्टच्या वतीने सवाद्य स्वागत करण्यात आले . चिकमंगळूरहून अशोक शर्मा गुरुजींना देखील आमंत्रित करण्यात आले होते .

यावेळी बोलताना कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे पदाधिकारी राकेश कलघटगी यांनी सांगितले कि , आम्ही श्री श्री रविशंकर याना दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी पत्र पाठवले होते . त्यांनी देखील आमंत्रण स्वीकारले आणि बेळगावमध्ये आल्यावर त्यांनी मंदिराला भेट दिली . मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष दौलत साळुंखे यांच्या हस्ते गुरुजींचा सत्कार करण्यात आला . यानंतर गुरुजींनी कपिलनाथांचे दर्शन घेऊन , गर्भगृहात दहा मिनिटे ध्यानधारणा केली आणि कपिलेश्वर मंदिरातील ऊर्जा अनुभवली .
यावेळी सुमारे दीडशेहून अधिक लोकांनी गुरुजींचे दर्शन घेतले .


Recent Comments