Belagavi

नागेश करंडक राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

Share

नेत्रहीन , डोळसांपेक्षा अधिक सक्षम असतात. हे सामान्य लोकांपेक्षा दहापट हुशार असतात . असे कौतुक डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी केले.

शहरातील , माहेश्वरी अंध विद्यालयात समर्थनम दिव्यांग संस्था आणि क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या दिनांक 5 ते 9 फेब्रुवारीत शहरातील केएससीए मैदानावर या कालावधीत आयोजित नागेश करंडक राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

आपल्या जिल्ह्याचे अभिमानास्पद सुपुत्र महांतेश किवडसन्नावर अंध असूनही देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. क्रिकेटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा झेंडा उंचावत त्यांनी जिल्ह्याचे नाव पुढे आणले. मी जन्मल्यापासून क्रिकेट पाहिलेले नाही. पण सोमवारी मी त्याच्यासोबत क्रिकेट पाहायला जाणार आहे. नजीकच्या काळात सर्वच क्षेत्रात चमकणारे अंध लोकही विधानसौधात दाखल होतील, असा आशीर्वाद त्यांनी दिला.

माजी क्रिकेटपटू सोमशेखर शिरगुप्पी यांनी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या व म्हणाले कि , तुमच्यात अफाट शक्ती आहे. त्याचा उपयोग करून खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक यश संपादन करावे.

संस्थेचे संस्थापक महांतेश महांतेश किवडसन्नावर यांनी पाहुण्यांचे स्वागतकेले . क्रिकेटमुळेच मी आज तुमच्यासमोर उभा असल्याचे सांगितले. पुढील विश्वचषक स्पर्धेसाठी माहेश्वरी स्कूल फॉर ब्लाइंड चिल्ड्रेनमधील किमान एक खेळाडू निवडला जावा. ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या स्पर्धेत आमचा संघ खेळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडियन कॉर्पोरेशन लिमिटेडचे विक्री प्रमुख ललित वडलमणी, महांतेश पाटील, कॅनरा बँकेचे विभागीय व्यवस्थापक पॉल मुधा, समर्थनमचे विश्वस्त उदयकुमार. वाय., माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेचे सचिव आनंद जोशी, विरेश किवडसन्नावर आदी उपस्थित होते.

Tags: