‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ या संस्थेतर्फे१८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगावच्या ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये ‘पहिल्या बालनाट्य संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखा आणि फुलोरा, बेळगाव या संस्थांचे सहकार्य या संमेलनाला लाभले आहे. सदर संमेलनासाठी बेळगाव मधील २५ ते३० शाळांमधील प्रत्येकी १५ मुले, याप्रमाणे एकूण ३०० मुलांचा सहभाग ऄसणार अहे.
या संमेलनाला लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे, लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर, अभिनेते प्रसाद पंडित, संमेलनाध्यक्षा माननीय मीना नाईक यांसह अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याचे बालरंगभूमी अभियान, मुंबईच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी सांगितले.

शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी नाट्यदिंडीने संमेलनाचे उद्घाटन करण्यात येइल. त्यानंतर बेळगावच्या कलाकारांचा सहभाग असलेली दोन बालनाट्य सादर करण्यात येतील. रविवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते१ या वेळेत बालरंगभमूी अभियानासाठी काम करणारे, मुंबइ – पुण्यातील तज्ञ सदर तीनशे मुलांसाठी अभिनयाची कार्यशाळा घेतील.
त्याचप्रमाणे शिक्षक आणि पालकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रासाठी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत बक्षीस मिळवलेल्या तीन नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. बेळगावच्या मुलांमध्ये अभिनयाची आवड निर्माण व्हावी, आत्मविश्वास वाढावा, त्यांच्यामध्ये सभाधीटपणा यावा, हा संमेलन बेळगाव येथे घेण्यामागे उद्देश आहे.


Recent Comments