Athani

अथणीमध्ये शहर विकास प्रकल्पांतर्गत करणार कामकाज

Share

अथणीमध्ये शहर विकास प्रकल्पांतर्गत आज माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि आमदार महेश कुमठल्ली यांच्या हस्ते अथणी शहरातील २७ वाड्यांमध्ये ३ कोटी ६० लाख रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या कामकाजाचे भूमीपूजन करण्यात आले.

माजी उपमुख्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य लक्ष्मण सवदी म्हणाले की, नगरविकास आराखड्यांतर्गत तालुक्याला पुरेसे अनुदान देण्यात आले असले तरी त्याचा विनियोग विकासासाठी व्हावा यासाठी कुमठल्ली व मी एकत्र येऊन सर्वाना विश्वासात घेतले आहे.
यावेळी निवडणुकीत 150 जागा जिंकून पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी पक्षातील सर्वजण कामाला लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

अथणी मतदान केंद्राचे तिकीट कोणाला मिळणार या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आमच्यापैकी एकजण निवडणूक लढवणार, एक आमदार होणार आणि दुसरा विधान परिषद सदस्य होणार.

यावेळी भाजपचे युवा नेते चिदानंद सवदी, अण्णासाब नायक, रवी सांक, रमण गौडा पाटील, मनपा सदस्य दिलीप लोणेरे, दत्ता वस्तार, संतोष सावकार, कलेश मड्डी, रावसाब ऐहोळे, रियाज सनदी, आशिफ तांबोळी, मल्लू हुद्दार , अब्दुल आझम मुल्ला, अतिक मोमिन, डॉ.अनील सौदागर, शशी साळवे, अनिल भंजत्री, महातेश बडगी, शांता लोणेरे, मृणालिनी देशपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:

athani laxmansavadi maheshkumattali