Belagavi

गॅस्ट्रोबाधित ग्रामस्थांची आ. निंबाळकरांकडून विचारपूस

Share

यल्लमा डोंगरावरून परतलेल्या गॅस्ट्रोची बाधा झालेल्या मोदेकोप्प ग्रामस्थांची खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सरकारी इस्पितळात भेट देऊन आरोग्याची माहिती घेतली.

 

खानापूर तालुक्यातील मोदेकोप्प येथील रहिवाशांना उलट्या व पोटदुखीमुळे खानापुरा सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती मिळताच, आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.

दर्शनासाठी यल्लम्मा डोंगरावर गेलेले मोदेकोप्पचे ग्रामस्थ यल्लम्मा देवीचे दर्शन घेतल्यानंतर जेवण करून गावी परतत असताना त्यापैकी काहींना पोटदुखी व उलट्यांचा त्रास होऊ लागला. गावात आल्यानंतर सर्वांची प्रकृती ढासळू लागली. तत्काळ गावातील काहींना प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींना खानापूर सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

यल्लम्मा डोंगरावर खाल्लेल्या अन्नामध्ये काहीतरी कमी-जास्त झाल्यामुळे तब्येत बिघडली. आ. निंबाळकर यांनी ग्रामस्थांशी बोलून त्यांची विचारपूस केली. यावेळी अनेक रहिवाशांची प्रकृती बरी झाल्याची माहिती मिळताच त्यांनी दिलासा व्यक्त केला.

Tags: