Dharwad

शिवलीला कुलकर्णी यांचा कोरवर यांच्या लढ्याला पाठिंबा

Share

जल मंडळ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे आणि कर्मचाऱ्यांचे सात महिन्यांचे वेतन जाहीर करावे, या मागणीसाठी धारवाड महानगर महापालिकेसमोर उपोषण करणाऱ्या जनजागृती संघाचे अध्यक्ष बसवराज कोरवर यांची माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्या पत्नी शिवलीला कुलकर्णी यांनी भेट देऊन पाठिंबा दिल्याने कुतूहल निर्मण झाले आहे.

बसवराजा कोरवर यांनी योगेश गौडा गौडा खून खटल्यातील विनय कुलकर्णीविरोधातील महत्त्वाची कागदपत्रे उघड केली होती. शिवाय विनय कुलकर्णी यांच्या विरोधात आघाडीही उठवली होती. एवढेच नव्हे तर योगेश गौडा खुनाचा खटला सीबीआयकडे सोपवण्यात यांची महत्त्वाची भूमिका होती. आता विनय कुलकर्णी यांच्या धर्मपत्नी शिवलीला कुलकर्णी यांनी कोरवर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून बसवराज कोरवर जलमंडळ कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. याला अनेकांनी पाठिंबा दिला असून आता शिवलीला कुलकर्णी यांनीही त्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे.

Tags: