Belagavi

मराठी महापौर-उपमहापौर झाल्याने कन्नड संघटनांना पोटशूळ

Share

बेळगावच्या महापौर-उपमहापौरपदी पुन्हा मराठी भाषिक नगरसेविकांची निवड झाल्याने बेळगावातील कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे. या विरोधात आंदोलन करण्याची कोल्हेकुई त्यांनी सुरु केली आहे.

बेळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीत प्रथमच एका राष्ट्रीय पक्षाला बहुमत मिळाले आहे. त्याच्या जोरावर भाजपने दोन्ही पदे अपेक्षेप्रमाणे पटकावली आहेत. आज झालेल्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका शोभा सोमनाचे आणि रेश्मा पाटील अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर पदी निवडून आल्या. पण त्या मराठी भाषिक असल्याने कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे. या निवडीने तोंडावर आपटल्या कन्नड संघटनांनी आता आंदोलनाची भाषा करत कोल्हेकुई सुरु केली आहे.

 

याबाबत कन्नड रक्षण वेदिकेच्या शिवरामेगौडा गटाचे जिल्हाध्यक्ष वाहिद हिरेकुडी यांनी निवडणुकीनंतर पालिकेच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. त्यानंतर गादीवर बसूनच कन्नड पत्रकारांशी बोलताना त्यांनी, बहुमत असल्याने कन्नड नगरसेवकांची या पदांवर निवड करण्याची मागणी आम्ही केली होती. पण पुन्हा मराठी भाषिक नगरसेवकांचीच निवड भाजपने केली आहे. या विरोधात आम्ही आंदोलन करू अशी दर्पोक्ती मारली.

 

एकंदर, भाजपने मराठी नगरसेवकांना ही पदे दिली असली तरी सत्ताधारी गटनेता पद कन्नड नगरसेवकाला दिल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही कन्नड संघटनांची ही कोल्हेकुई पाहता केवळ भाषिक वाद निर्माण करून पोळी भाजून घेण्याचा या संघटनांचे तंत्र उघड झाले आहे.

Tags: