Belagavi

झालाच पाहिजे !… म. ए. समितीच्या नगरसेवकांची पालिकेत घोषणाबाजी

Share

तब्बल सव्वा वर्षानंतर बेळगाव महानगर पालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक आज होत आहे. यासाठी महापालिकेत दाखल झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी बेळगाव, कारवार, खानापूर, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत पालिकेचा परिसर दणाणून सोडला.

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन सुमारे सव्वा वर्षाचा कालावधी लोटला आहे. या ना त्या कारणावरून लांबणीवर पडलेल्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक आज होत आहे. बेळगावचे प्रादेशिक आयुक्त महांतेश हिरेमठ यांच्या देखरेखीखाली सकाळी दहा वाजल्यापासून निवडणूक प्रक्रियेला सुरवात झाली आहे. दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही पदासांठी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

दरम्यान, निवडणुकीसाठी रवी साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ३ नगरसेवक भगवे फेटे बांधून सकाळी पालिका आवारात दाखल झाले.

पालिकेत येताच त्यांनी, बेळगाव, कारवार, खानापूर, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय अशा घोषणा देत पालिकेचा परिसर दणाणून सोडला. नगरसेवक रवी साळुंखे, रवी मंडोळकर आणि वैशाली भातकांडे यांनी शुभ्र कपडे आणि भगवे फेटे परिधान करून मराठी अस्मितेच्या घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या पायऱ्यांवर विनम्रपणे माथा टेकून नमस्कार केला त्यानंतरच त्यांनी पालिकेत प्रवेश केला.

Tags: