Belagavi

सह्याद्रीनगरातील महालक्ष्मी मंदिरात द्राक्षांची आरास

Share

बेळगावातील सह्याद्रीनगरातील महालक्ष्मी मंदिरात देवीला द्राक्षांची आरास करण्यात आली होती. भारत पौर्णिमेनिमित्त मंदिर समितीने हा उपक्रम राबवला.
बेळगावातील सह्याद्रीनगरातील महालक्ष्मी मंदिरात वर्षभर विविध धार्मिक उपक्रम राबविले जातात. भारत पौर्णिमेनिमित्त मंदिर समितीने महालक्ष्मी देवीची द्राक्षांच्या सजावटीने आरास केली होती. देवीच्या पाठीमागे हिरव्यागार द्राक्षांचे घोस लटकावून ही आरास करण्यात आली होती. भाविकांनी मंदिरात येऊन मनोभावे देवीची पूजा करून दर्शन घेतले.

या संदर्भात ‘आपली मराठी’ला माहिती देताना मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत हिरेमठ यांनी सांगितले की, भारत पौर्णिमेनिमित्त आणि मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वर्धापनदिनानिमित्त महालक्ष्मी देवीची द्राक्षांची सजावट करून आरास करून विशेष पूजा करण्यात आली आहे. भक्तांनी यथाशक्ती दिलेल्या ५० किलोहून अधिक द्राक्षांचा वापर यासाठी केला आहे.

मंदिर उभारणीला २२वर्षे झाली असून नवीन मूर्ती प्रतिष्ठापना करून ६ वर्षे झाली आहेत. दरवर्षी १ मे रोजी कामगार दिनी देवीचा यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मंदिरात पुजारी रवी शास्त्री नित्यनेमाने देवीची मनोभावे पूजा करतात. आज देवीची द्राक्षांनी विशेष आरास केली आहे. भक्तही मोठ्या संख्येने येऊन दर्शन घेत आहेत. मंदिराचा उत्तरोत्तर विकास व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, देवीच्या सजावटीचे भक्तांनी कौतुक केले. दिवसभर सह्याद्रीनगर, महांतेशनगरसह बेळगाव परिसरातील भाविकांनी मंदिरात हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले.

Tags: