Belagavi

काँग्रेसच्या निवडणूक प्रचारासाठी खास वाहन बेळगावात दाखल

Share

राज्यात दोन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आहेत. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली असून काँग्रेस पक्षाकडून प्रचारासाठी खास नवीन वाहन तयार करण्यात आले आहे. ते बेळगावात दाखल झाले आहे.

बेळगावसह सहा जिल्ह्यांत काँग्रेसकडून प्रचाराची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी खास वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे. या वाहनात सहा स्पीकर आणि कॉलिंगसाठी मायक्रोफोन आहे. रात्रीच्या वेळीही सभेमध्ये वापरण्यासाठी वाहनावर एलईडी लाईट आणि सुसज्ज पोडियम आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी, इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या आणि सतीश जारकीहोळी यांचीही छायाचित्रे लावण्यात आली आहेत.

राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे. यावेळी ते उलथून काँग्रेसचे सरकार स्थापनेसाठी काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी काँग्रेसने सर्व तयारी केली आहे. राज्यात विधानसभेच्या सर्वाधिक जागा बेळगाव जिल्ह्यात आहेत. बेळगाव जिल्ह्यात सर्वोच्च स्थान मिळवण्यासाठी काँग्रेसची तयारी सुरू आहे. जिल्हाभरातील काँग्रेसच्या प्रचारासाठी हे वाहन बेळगावात दाखल झाले. बेळगावातील काँग्रेस भवनच्या आवारात हे वाहन ठेवण्यात आले आहे.

Tags: