Accident

मृत्यू अटळच ! अपघातात जखमीचा दुसऱ्या अपघातात मृत्यू

Share

मृत्यू अटळ असतो म्हणतात. याचीच प्रचिती देणारी दुर्घटना घडली आहे. अपघातात जखमी झालेल्या तरुणाला उपचारांसाठी नेणाऱ्या ऍम्ब्युलन्सला उसवाहू ट्रॅक्टरने धडक दिल्याने त्या तरुणाचा ऍम्ब्युलन्समध्येच स्ट्रेचरवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्तीजवळ बेळवडी येथे हा अपघात झाला.

सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगरावर बांगड्या विकणारा 28 वर्षीय तरुण अकबरसाब हुसेनसाब नेसरगी हा सौंदत्तीकडे येत असताना त्यांची दुचाकी घसरल्याने गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सौदत्ती रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने बेळगाव येथे नेण्यात येत होते. याचवेळी सौंदत्तीजवळ बेळवडी क्रॉसजवळ एका उसवाहू ट्रॅक्टरने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. त्यामुळे

रुग्णवाहिकेतील स्ट्रेचरवरून पडून अकबरसाबचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याची आई जन्नतबी, भाऊ मोहम्मद अली, रुग्णवाहिकेत असलेले नातेवाईक मेहबूबसाब शब्बीर नेसरगी हे या अपघातात जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोडवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: