आमचा पक्ष राष्ट्रीय आहे, राज्यातील 224 मतदारसंघात पक्ष उमेदवार उभे करेल असे सांगत कारकळ मतदार संघ श्रीराम सेनेला सोडण्यात येणार नाही असे संकेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले.
कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक अधिवेशनासाठी विजापुरात आले असता, सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. बोम्मई म्हणाले, कारकळ मतदार संघ भाजपकडेच आहे. मंत्री सुनीलकुमार तिथून निवडून आले आहेत. तब्बल तीन वेळा ते जिंकले आहेत.
आमचा पक्ष राष्ट्रीय आहे, सर्व 224 मतदारसंघात पक्ष उमेदवार उभे करेल असे सांगत कारकळ मतदार संघ श्रीराम सेनेला सोडून देण्याच्या मागणीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
भाजपचे काही आमदार काँग्रेसमध्ये येतील, या सिद्धरामय्या यांच्या विधानाला उत्तर देताना, त्यांनी आधी काँग्रेसचे आमदार मजबूत ठेवावेत, असे सांगितले.
बोम्मई सरकारवर राज्यात 3 लाख कोटींचे कर्ज आहे, या आरोपाला उत्तर देताना, कोविड कालावधी वगळता सर्वाधिक कर्ज काँग्रेसनेच लादले आहे, सिद्धरामय्या सरकारने पाच वर्षांत सर्वाधिक कर्जे थकवल्याची ख्याती आहे असे ते म्हणाले. सिद्धू आणि डीकेशी यांच्या आश्वासनांच्या महापुराबाबत डॉ. जी. परमेश्वर यांनी नाराजी व्यक्त केल्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना, ही त्यांची अंतर्गत बाब आहे, मी त्यावर भाष्य करणार नाही, पण परमेश्वर अतिशय बुद्धिमान नेते असून, सर्व काही समजून घेतात, त्यांनी अशा प्रकारे नाराजी व्यक्त केली हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. ते म्हणाले त्यांच्यात काहीही अयोग्य आणि चुकीचे नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, रमेश जारकीहोळी यांनी सीडी प्रकरणावर अमित शहांची भेट घेतल्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया न देता मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला.


Recent Comments