सौंदत्ती जत्रेदरम्यान दारूची अवैध विक्री सुरू असल्याच्या तक्रारींनंतर सौंदत्ती पोलिसांनी छापेमारीची मालिका सुरूच ठेवली आहे.
पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकून आतापर्यंत ५ गुन्हे दाखल केले असून, तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हे छापे सुरूच असून आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या आजूबाजूला आणि तालुक्यातील गावांमध्ये दारूची अवैध विक्री सुरू असल्याची तक्रार अनेक दिवसांपासून होत आहे. तत्कालीन आमदार आनंद मामनी यांनी याबाबत अनेकवेळा उघडपणे यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.


Recent Comments