Belagavi

ग्रामीण युवक- शालेय मुलांना जिम, क्रीडा साहित्याचे वाटप

Share

तरुणांनी आणि शाळकरी मुलांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनांना, संगतीला बळी न पडता तंदुरुस्त राहून शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवावे असे आवाहन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केले.

बेळगावातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयात ग्रामीण युवक- शालेय मुलांना जिम, क्रीडा साहित्याचे वाटप करून ते बोलत होते. ग्रामीण मतदार संघातील सुमारे 10 गावे निवडली आहेत. तेथे क्रीडा उपकरणे, साहित्य वाटप केले आहे. नजीकच्या काळात प्रत्येकाला व्यायाम शाळा व क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

2022-23 च्या आमदारांच्या स्थानिक मतदारसंघ विकास निधीतून पहिल्या टप्प्यात 25 आणि दुसऱ्या टप्प्यात 25 उपकरणे संच देण्यात येणार असून येत्या काही दिवसांत आणखी 50 क्रीडा संच देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक हितासाठी आज ग्रामीण मतदार संघांतर्गत संतीबस्तवाड, हंगरगा, बस्तवाड, हलगा, के. के. कोप्प, कंग्राळी बीके, भेंडीगेरी, बेळगुंदी, देसूर, उचगाव या गावांमध्ये शालेय मुलांसाठी व्यायाम व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षण विभागाचे क्षेत्रीय शिक्षणाधिकारी व ग्रामपंचायत अध्यक्ष तसेच
ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष यल्लाप्पा ढेकोळकर, युवराज कदम, सातेरी बेळवटकर, जयराम पाटील, रघुनाथ कोंडुसकर, दत्ता पाटील, शिवाजी बोकडे आदी उपस्थित होते.

Tags: