बेळगावातील हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथील श्री दानम्मादेवी मंदिरातील देवीच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वार्षिकोत्सवाचा उत्साहात समारोप झाला. यानिमित्त शहर-परिसरातील विविध सामाजिक संस्थांना मंदिर ट्रस्टतर्फे साहित्याची मदत देण्यात आली.
हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथील श्री दानम्मादेवी मंदिरातील देवीच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वार्षिकोत्सवाचा समारोप उत्साहात झाला. वार्षिकोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कारंजीमठाचे श्री गुरुसिद्धस्वामीजी यांच्या सानिध्यात झालेल्या समारोप कार्यक्रमात श्री दानम्मादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी, सदस्य बाबन्ना हुक्केरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार सुनीता देसाई यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना श्री दानम्मादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी म्हणाले, मंदिरात दानम्मा देवीची मूर्ती प्रतिष्ठापना केल्यापासून दरवर्षी वर्धापनदिन साजरा केला जातो. विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांतून समाजाचा विकास साधने हेच आमचे उद्दिष्ट आहे. दानम्मा देवी मंदिर ट्रस्ट समाजातील गरजू लोक, स्वयंसेवी संस्थांना नेहमीच मदत करत आला आहे. यंदा महेश फौंडेशन, समर्थनम अशा २० स्वयंसेवी संस्थांना ट्रस्टकडून विविध आवश्यक साहित्याची मदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पत्रकार सुनीता देसाई यांनी, ट्रस्टच्या कार्याची प्रशंसा केली. या मंदिरात मी आधीपासून येते, मंदिर ट्रस्टकडून नेहमी सामाजिक कार्याला, समाजाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येते असे त्यांनी सांगितले.
येवले बोलताना गुरुसिद्ध स्वामीजींनी समाजाच्या विकासासाठी मंदिरे आणि मठ महत्वाची भूमिका बजावत आहेत, सर्वानी समाजाच्या उद्धारासाठी अशा तऱ्हेने एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी दानम्मादेवी मंदिर ट्रस्टकडून सामाजिक संस्थांना मदत देण्यात आली. याप्रसंगी मंदिर समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि भाविक उपस्थित होते.


Recent Comments