वाहतूक नियमांचा भंग केल्याबद्दल दाखल गुन्ह्यात संबंधितांना निम्मी सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचा लाभ घेऊन नागरिकांनी दंड भरावा असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रथम मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश मुस्तफा हुसेन एस. ए. यांनी केले आहे.
बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना न्या. मुस्तफा हुसेन एस. ए. म्हणाले, उभय पक्षांत समझोता घडवून आणून प्रलंबित खटल्यांचा वेगाने निपटारा करण्यासाठी येत्या ११ फेब्रुवारीला भव्य लोक अदालत आयोजित केली आहे. राज्यातही प्रत्येक जिल्ह्यात या दिवशी लोक अदालतींचे आयोजन केले आहे. त्यासोबतच वाहतूक नियमभंगाबद्दल प्रलंबित प्रकरणात निम्मा दंड भरून ही प्रकरणे निकालात काढण्याची सूचना उच्च न्यायालयाचे न्या. बी. वीरप्पा यांनी केली होती. त्यानंतर सरकारला तसा प्रस्ताव पाठवला होता. तो स्वीकारून सरकारने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, राज्यभरात अशा प्रकरणात दंडात सूट देण्यात येत आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बेंगळूर येथे काल एकाच दिवसात लोकांनी विक्रमी दंड भरला आहे. बेळगाव जिल्ह्यात, खासकरून शहरात वाहतूक नियमभंगाचे गुन्हे मोठ्या प्रमाणात दाखल आहेत. त्यातील संबंधितांनी ५०% सवलतीत दंड भरून निश्चिन्त व्हावे असे आवाहन न्या. मुस्तफा हुसेन यांनी केले.
यावेळी बोलताना बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सांगितले की, बेळगाव शहरात वाहतूक नियमभंगाचे ६ लाखहुन अधिक गुन्हे दाखल असून दंडाची रक्कम २६ कोटीवर देय आहे. हा दंड निम्म्या सवलतीत भरण्याची संधी सरकारने उपलब्ध केली आहे. त्याचा लाभ नागरिकांनी घेऊन स्वतःची दंड भरावा असे आवाहन त्यांनी केले. बाईट
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील उपस्थित होते.


Recent Comments