बंजारा समाजाचे आराध्य दैवत सेवालाल महाराज यांचा पुतळा मुंबईतील आझाद मैदानामधून यवतमाळमधील पोहरादेवीच्या दिशेनं आज रवाना होणार आहे. यासाठी भव्य बाईक रॅली देखील काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील अनेक युवक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.

हा पूर्णाकृती ब्रॉन्झचा पुतळा हा यवतमाळच्या रामू चव्हाण यांनी साकारला आहे. 11 फूट उंच आणि 11 फूट लांब असलेला अश्वारुढ पुतळा जवळपास दीड टन वजनाचा आहे.
बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी 12 फेब्रुवारी रोजी सेवाध्वज कार्यक्रमानिमित्त सेवालाल महाराज 11 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. 12 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री यांची उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
सेवालाल महाराज यांचा पूर्णाकृती ब्रॉन्झचा पुतळा हा यवतमाळच्या रामू चव्हाण यांनी साकारला आहे. 11 फूट उंच आणि 11 फूट लांब असलेला अश्वारुढ पुतळा जवळपास दीड टन वजनाचा आहे. मागील वर्षभरापासून आठ ते दहा जणांनी दिवसरात्र एक करुन या पुतळ्याची निर्मिती केली. 60 टक्के ब्रॉन्झ, 30 टक्के जस्त आणि 10 टक्के कथिल आणि लोखंड इतर साहित्यापासून तयार करण्यात आला आहे.
अतिशय सुंदर नक्षीकाम आणि कोरीव चेहऱ्यावर स्मित हास्य असलेले सेवालाल महाराज अश्वारुढ असून महाराज हात उंचावून सर्वांना आशीर्वाद देत असल्याचे दर्शवण्यात आले आहे. आज हा पुतळा यवतमाळवरुन पोहरादेवीला वाजत गाजत येणार आहे. या पुतळ्याचे आझाद मैदानमधून सजवलेल्या ट्रकमधून पोहरादेवीकडे प्रस्थान होणार आहे. सोबतच बाईक रॅलीचे आयोजन केले असून, जिल्हाभरातील शेकडो युवक मोटारसायकल रॅलीत सहभागी होणार आहेत. यावेळी लेंगी पथक आणि ढोलताशांच्या गजरात हा पुतळा पोहरादेवीकडे नेण्यात येणार आहे.
Recent Comments